यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोणा येथे तहसीलदार जितेद्र कुंवर यांनी तलाठी कार्यालयास भेट देऊन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी सर्व पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे किंवा नाही, याचा आढावा घेतला.
सामाईक खात्यातील जमीन प्रत्यक्ष जो व्यक्ती कसत असेल, त्या व्यक्तीचे कुटुंब या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे सामायिक खात्यातील सर्व शेतकरी बांधवांनी बॅंक पासबुक, आधार नंबर व मोबाईल नंबर, गट नंबर अशी संपूर्ण कागदपत्रे दि.१० जुलै २०१९ पर्यंत तातडीने आपआपल्या गावातील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडे जमा करावीत, अशी सुचना शेतकरी बांधवांना देण्यात आली आहे. तलाठी सौ. सुमन हर्षल आंबेकर (कोतवाल) यांनी गावात दवंडी देवुन व प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घरी जावुन त्यांना या योजनेची माहिती कळवली आहे. तसेच त्यांना लवकरात लवकर कागदपत्रे जमा करण्याचे आवाहनही केले आहे. तहसीलदारांनी भेट दिली त्यावेळी फैजपूरचे मंडळ अधिकारी जे.डी. बंगाळे, भालोदचे मंडळ अधिकारी आर.डी. पाटील, हिंगोणा यथील तलाठी डी.एच. गवई व सुमन आंबेकर कोतवाल यांच्यासह अनेक शेतकरी हजर होते.