Home क्राईम यावलच्या ग्रामीण रूग्णालयात अश्‍लील चाळे करणार्‍याला चोप

यावलच्या ग्रामीण रूग्णालयात अश्‍लील चाळे करणार्‍याला चोप

0
59

यावल प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये एक कर्मचारी महिलेसोबत अश्‍लिल चाळे करताना आढळल्याने खळबळ नागरिकांनी त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये एका कर्मचारी मंगळवारी सुटीचा दिवस असल्याने रुग्णालयात आला होता. रुग्णालयामध्ये शांतता होती. मात्र, रुग्णालयात प्रसुतीसाठी महिला आली होती. दरम्यान, रुग्णालयात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्या खोलीचा आतून दरवाजा बंद आढळून आला. रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या त्या महिलेसोबत आलेल्या काही नागरिकांनी दरवाजा ठोठावला असता एका महिलेसोबत एक व्यक्ती अश्‍लिल चाळे करीत असल्याचे आढळून आले. नागरिकांनी त्याला रंगेहात पकडून चोपले. मात्र गर्दी पाहाताच संबंधित महिलेने तेथून काढता पाय घेतला. नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस निरीक्षक डी.के. परदेशी हे पुढील तपास करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound