Home Uncategorized यावल पं.स. सहाय्यक गटविकास अधिकारीपदी तडवी यांची नियुक्ती

यावल पं.स. सहाय्यक गटविकास अधिकारीपदी तडवी यांची नियुक्ती

0
25

tadavi

 

यावल प्रतिनिधी । यावल पंचायत समितीच्या नियमित सहाय्यक गटविकास अधिकारी पदाचा आज एल.आय.तडवी यांनी पदभार स्विकारला आहे.

यावल पंचायत समितीच्या मागील एका वर्षापासुन रिक्त असलेल्या या पदावर अखेर जळगाव येथील पशुधन पर्यवेक्षक अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले एल.आय.तडवी यांची पंचायत समिती यावलच्या सहाय्यक गटविकास अधिकारीपदावर नेमणुक करण्यात आली आहे. तसेच नियमित गटविकास अधिकास अधिकारी म्हणुन एन.एस.पाटील यांनी यावल पंचायत समितीची सुत्रे सांभाळल्याने व सहाय्यक गटविकास अधिकारी यावल तालुक्यास मिळाल्याने ग्रामीण भागातील विकास कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

एल.आय.तडवी यांनी या वर्षी १९८८ ते ९६ या कालावधीत पशुधन पर्यवेक्षक म्हणुन कार्यरत होते. नंतर ते जामनेर पंचायत समितीमध्ये ६ वर्ष सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणुन कार्य केलेले आहे.


Protected Content

Play sound