यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पंचायत समितीच्या होवू घातलेल्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीला आता वेग आला असून यासाठी तालुक्यातील पंचायत समितीच्या १२ गणांसाठीच्या गणनिहाय आरक्षण आज जाहीर करण्यात आले. यात महीलांना समान संधी मिळाल्याने पुन्हा यावल पंचायत समितीवर महिलांचे वर्चस्व राहणार आहे.
यावलच्या तहसीलच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयात आज गुरुवार, दि. २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हा भुसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील यांच्यासह यावल तहसीलदार महेश पवार, नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांच्या उपस्थितीत यावल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचे गणनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले.
गणांचे आरक्षण याप्रमाणे असेल –
नायगाव गणासाठी – एसटी महीला
किनगाव बु ॥ – एसटी सर्वसाधारण
सावखेडा सिम – एसटी सर्वसाधारण
दहिगाव गणासाठी – सर्वसाधारण
मारूळ गणासाठी – सर्वसाधारण
न्हावी प्रगणे यावल – सर्वसाधारण
बामणोद गणासाठी – एससी
हिंगोणे गणासाठी – सर्वसाधारण महीला
डांभुर्णी गणासाठी – एसटी महीला
साकळी गणासाठी – सर्वसाधारण महीला
भालोद गणासाठी – सर्वसाधारण महीला
पाडळसा गणासाठी – ओबीसी महीलासाठी
या आरक्षण सोडतीच्या बैठकीस काँग्रेस कमेटी अप्पा सोनवणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख रविन्द्र सोनवणे, जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील, पंचायत समितीच्या काँग्रेसचे माजी गटनेते शेखर पाटील, रिपाई (आठवले) गटाचे अरूण गजरे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी एजाज पटेल या१० वर्षाच्या शाळकरी मुलाच्या हस्ते एसटी जातीच्या महीलांचे आरक्षण चिठ्ठीद्वारे काढण्यात आलीत.