यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल पंचायत समितीच्या कार्यालयात यावल तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनी कर्तृत्ववान माहिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यालयातील महीला अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. श्रीमती मंजुश्री गायकवाड-बोरसे, पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधी सदस्या कलीमा सायबु तडवी, पंचायत समिती सदस्या लक्ष्मी विजय मोरे, पंचायत समितीच्या कार्यालयीन कर्मचारी म्हणुन कार्यरत असलेल्या वरिष्ट सहाय्यक अंजनी लोहारो, कनिष्ठ सहाय्यक सुनिता सोनवणे, कनिष्ठ सहाय्यक वर्षा राऊत, भारती चौधरी, किर्ति चौधरी, डाटा एंट्री ऑपरेटर मनिषा खाचणे, कार्यालयीन शिपाई फुलवंती भादले, शिपाई अपशान तडवी, ऑपरेटर तनुजा तडवी यांचा सन्मान करण्यात आला. शासकीय सेवेने आर्दश निर्माण करणाऱ्या कर्तृत्वान महीलांचे यावल तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने हा गौरव करण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष रुबाब तडवी, हितू महाजन, ग्रामसेवक राजू तडवी यांच्यासह आदी आदी उपस्थित होते.