सिकलसेल किट व औषधी खरेदीतील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय आरोग्य अभियांना अंतर्गत सिकलसेल किट व औषधी खरेदीत मोठा गोंधळ व भ्रष्ठाचार झाल्याची तक्रार रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गटाचे ) युवा विभागाचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वानखेडे यांनी एका लिखित तक्रारी व्दारे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांच्याकडे केली आहे.

ॠसविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

या संदर्भात रिपाई युवा विभागाचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत राजकुमार वानखेडे यांनी जिल्हा परिषद जळगाव येथे केलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की , आपल्या विभागा अंतर्गत सिकलसेल किट व औषधी जिएम पोर्टल वरून नुकतीच खरेदी करण्यात आली आहे .परन्तु या खरेदी मध्ये मोठा भ्रष्ठाचार झाल्याचे निर्देशनास आले आहे . या संदर्भातील पुरावे देखील तक्रार निवेदना सोबत जोडलेले आहे. सिकलसेल विभागाचे संबधीत अधिकारी यांनी सिकलसेल चाचणीसाठी किट व औषधीच्या खरेदीसाठी शासन निर्णयानुसार जिएम पोर्टल वरुन खरेदीचे आवेदन मागविले होते.

त्या अनुषंगाने श्री ट्रेडर्स यांना बिलो रेट प्रमाणे खरेदी करण्याचे आदेश आहे . त्यात त्यांनी किट पुरविण्यात येतील असे सांगीतले . याबाबत मागणी करण्यात आलेल्या किट व औषधीचा पुरवठा करून बिल देखील देण्यात आले .परन्तु या बाबत ची सत्य परिस्थिती अशी की जि एमपोर्टलला टाकण्या आदीच आपल्या काही अधिकार्‍यांनी त्यांचे नातेवाईक असलेल्या श्री ट्रेडर्सच्या श्री नाईक नांवाच्या इसमाशी संपर्क साधुन त्यांच्याकडून निविदा मागविली. युका डाइग्नोस्ट्रक नांवाचे सिकलसेल किटवर स्पष्टपणे ५७५ रूपये किमतीला आहे असे स्पष्टपणे त्यांनीय दिलेल्या पत्रात दिसुन येत आहे. हे पत्र / निविदा कुणालाही दाखवण्यात आली नाही. तथाफि, अधिकारी यांनी श्री ट्रेडर्सला बायोल्याबच्या किट चे बिल घ्या आणि युको डायग्नोस्टीक चे द्या असे सांगून युका डायग्नोस्टिक नांवाच्या किटस प्रयत्यक्षात घेतल्या व शासनाची दिशाभुल करीत संबधीत किट पुरवठा धारकास बिल देखील अदा करण्यात आलेत, या महोदयांनी थेट नागपुर येथुन पुरवठा धारकाशी संपर्क साधुन चाळीस हजार रूपये वरिष्ठ अधिकारी यांना द्यावेत असे सांगत त्यांच्या म्हण्यानुसार अशा बोगस किट मागवुन घेतल्या. एवढेच नाही तर शासकीय नियमानुसार त्या किट ची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातुन गुणवत्ता चाचणी देखील करता त्या सिकलसेल किटस जिल्ह्यात वाटप ही करण्यात आल्या असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, या सर्व गोंधळात एक मुद्दा म्हत्वाचा म्हणजे बिल वेगळ्या कंपनीचा माल वेगळया कंपनीचा घेतला जातो त्यात ही किट ची किमत स्थानिक बाजार भावा पेक्षा अधिक जास्त, त्यात ही दुसरी महत्वाची बाब म्हणजे युका कंपनीच्या किट मध्ये सिकलसेल टेस्टींगसाठी लागणारे साहित्यच परिपुर्ण नसल्याचे दिसुत येत आहे. या आर्थिक घोळाच्याा बाबी नाशिक येथील किट पुरवठा धारकाने नकार दिल्याने नागपूरच्या पुरवठा धारकाला किट मागाविण्याचे आदेश देण्यात यावीत या साठी खटाटोप हे सर्व पुराव्यांसह जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांना देण्यात आलेल्या तक्रार निवेदनास जोडलेली आहे.

या संदर्भात वरिष्ठ अधिकारी यांनी तातडीने अशा प्रकारे आर्थिक मोहास बळी पड्डन जिल्ह्यातील शेकडो रुग्णांच्या आरोग्य व जिवाशी खेळ करणार्‍यांना घोटाळेबाजांवर तात्काळ कार्यवाही करीत त्यांना शासकीय सेवेतुन बडतर्फ करावे व त्यांना पाठीशी घालणार्‍यांची देखील त्वरीत चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यात यावी. तिन दिवसात गार्ंभीयाने लक्ष देवुन ही कार्यवाही न झाल्यास आपण रिपाइं आठवले गटाच्या युवा विभागाच्या माध्यमातुन लोकशाहीच्या मार्गाने बेमुदत आंदोलन करणार असल्याचा ईशारा रिपाई जिल्हा युवा शाखेचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत राजकुमार वानखेडे दिला आहे.

Protected Content