यावल नगरपरिषदतर्फे २४१ दिव्यांगांना निधीचे वितरण

यावल प्रतिनिधी । राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी पाच टक्के अपंगांच्या हितासाठी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, यावल नगरपरिषदेने शहरातील एकूण २४१ अपंगांना त्यांच्या बँक खात्यांद्वारे थेट पैशांचे वितरण केले आहे.

नगरपरिषदचे मुख्याधिकारी बबन तडवी, नगराध्यक्षा नौशाद तडवी, उपनगराध्यक्षअध्यक्षा रुखमाबाई भालेराव (महाजन) यांनी निधीचे वितरण केल्याने शहरातील दिव्यांग बांधवांमध्ये व त्यांच्या कुटुंबामध्ये परिषदच्या कार्याबद्दल आनंदाचे वातावरण आहे. दिव्यांग निधी मिळणेसाठी नगरपरिषदचे गट नेते तथा माजीनगराध्यक्ष अतुल पाटील, नगरसेवक माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांनी शासनाच्या माध्यमातुन सतत पाठपुरावा केल्याने यावल शहरातील दिव्यांग लाभार्थी बांधवानी नगराध्यक्ष मुख्याधिकारी व लोकप्रतिनीधी मान्यवराचे आभार मानले. निधीवितरण कामकाजासाठी मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन अधिकारी विजय बड़े, लेखापाल शरद पाटील, लेखापरिक्षक नितीन सुतार व दिव्यांग कर्मचारी मोहन सोनार यांनी आपला सहभाग नोंदवला.

 

Protected Content