यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिका कार्यक्षेत्राच्या हद्दीतील आसाराम नगर परिसरातील उद्यानाच्या विविध समस्या संदर्भात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते या निवेदनाची त्वरित दखल घेत नारपालिका प्रशासनाने त्या उद्यानाच्या कामास सुरूवात केली आहे.
याबाबत यावल शहर शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुखांच्या माध्यमातुन प्रमुख पंकज बारी, सागर कोळी व आदी शिवसैनिकांनी यावल शहर नगरपालिका प्रशासनास यावल शहरातील नगरपालिका कार्यक्षेत्राच्या विस्तारित परिसरातील आसाराम नगर मधील बाल उद्यानाच्या स्वच्छता व आदि विविध समस्यांना घेवुन लिखित निवेदन देण्यात आले होते. यात आसाराम नगर सार्वजनिक बाल उद्यानासह शहरातील काही समस्यांचा निराकरण करण्यासंदर्भात त्या निवेदनामध्ये विशेष उल्लेख करण्यात आला होता.
यामध्ये शहरातील अतिश्य नागरीकांची वर्दळ असलेल्या भुसावळ टी पॉइंटवरील नगरपालिका कॉम्प्लेक्स समोरील धापा चार महिन्यापासून तुटून पडलेला आहे त्या धापा तुटून पडल्यामुळे या ठीकाणी मोठे खड्डा निर्माण झाले असुन या खड्डयात दुचाकी मोटरसायकल व चारचाकी फॉर व्हीलर गाड्या वाहनांचे नेहमी अपघात होवुन अनेकांना दुखायतींना सामोरे जाने लागत आहे . तरी नगरपालीका प्रशासनाने तात्काळ त्या धाप्यावरती पाईप टाकून त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने यावल शहरप्रमुख पंकज बारी यांनी सादर केलेले निवेदनाद्वारे केली असून, तरी नगरपालिका प्रशासनाने बांधकाम अभियंता यांनी तात्काळ या दोन्ही कामांची अंमलबजावणी करावी अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली होती व या निवेदनातील मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी न केल्यास शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नगरपालिका कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल असाही या निवेदना व्दारे देण्यात आला होता याची नगरपालिका प्रशासनाने शिवसेनेच्या तक्रारीची नोंद घेत सर्वप्रथम नगरपालिका प्रशासनाने शहरातील विस्तारित नविन वसाहती मधील आसाराम नगर बाल उद्यानाच्या स्वच्छता कामास प्रत्यक्षात आज ५ एप्रील रोजी सकाळपासुन कार्य आरंभ केल्याने परिसरातील नागरीकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे .