यावल प्रतिनिधी । केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी कायद्याविरोधात राज्यात होत असलेल्या आंदोलनास यावल तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे पाठिंबा देण्यात आला असून धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी कायद्याच्या विरोधात भारतातील तमाम अन्नदात्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर जे आंदोलन मागील आठ दिवसांपासुन सुरू केलंय त्याला पाठिंबा देण्यासाठी आज तहसील कार्यालय यावल येथे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने आणि जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील आणि आ.शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी जेष्ठ नेते व काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, मोहम्मद खान, इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग देवनाथ पाटील, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन चौधरी, यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, खलील शाह कादर शाह, यावल खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भिरुड, यावल तालुका कॉग्रेसचे उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, सतीशआबा पाटील, काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील सत्तार पटेल, काँग्रेसचे यावल शहर अध्यक्ष कदिर खान, संदीप सोनवणे, चंद्रकला इंगळे, पुंडलिक बारी, सुरेश भालेराव, अजय बढे, नईमभाई शेख, वसीम खान, इखलास सय्यद, रहेमान खाटीक, इम्रान पहेलवान, राजू करांडे, विनोद पाटील, भूषण भाऊ, सकलेंन शेख, जागो भाई, अनिल पाटील, लीलाधर सोनवणे, राहुल भाऊ, धिरज सोनवणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी याप्रसंगी आंदोलनात सहभागी झाले होते.