यावल प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आज युवती सभेतर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एफ.एन.महाजन होते. युवती सभा प्रमुख डॉ. सुधा खराटे यांनी महिला दिनाची पार्श्वभूमी सांगितली. त्यांनी मार्गदर्शन केले की, प्रत्येक महिलेमध्ये कार्यक्षमता असते, ती ओळखा. तिला विकसित करा, तुमच्यावर अन्याय होत असेल तर त्याचा प्रतिकार करा, स्वतःचे आत्मबल वाढवा. आयुष्य एकदाच भेटते ते कमजोर होऊन न संपवता त्याला आत्मविश्वासाने तोंड देऊन चांगलं आयुष्य जगा.
प्राचार्य डॉ.एफ.एन. महाजन यांनी अध्यक्षीय भाषणात विचार मांडले की,सरकारने महिलांना अनेक सवलती दिलेल्या आहेत, त्या सवलतींचा खर्या अर्थाने स्वतःसाठी लाभ करून घ्या. एखादं पद मिळाल्यावर स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. सूत्रसंचालन नंदिनी कोळी हिने केले तर आभार भाग्यश्री जवागे हिने मानले. कार्यक्रमास प्रा. डॉ.एस.पी. कापडे, प्रा.राजेंद्र देशमुख, प्रा.ए.पी. पाटील, प्रा.व्ही.बी.पाटील, प्रा.अहिरराव यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या .