यावल, प्रतिनिधी | यावल नगर परिषदच्या माध्यमातुन केन्द्र आणि राज्य शासनाच्या स्वच्छ भारत अभियानास यशस्वी करण्यासाठी राज्यात विविध ठीकाणी उभारण्यात येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाने विकसीत करण्यात येणाऱ्या घनकचरा प्रकल्प उभारणीस पुर्णत्वाकडे घेवुन जाणारी संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील यावल नगर परिषद ही एकमेव असेल, अशी माहीती पत्रकारांना माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील यांनी दिली.
अतुल पाटील यांनी शहराच्या विकासासाठी नवी दिशा देणारे हे महत्वपुर्ण प्रकल्प असल्याचे सांगितले. या प्रकल्प उभारणीस आपण १४ व्या वित्तीय आयोगाच्या निधीतुन सुमारे तीन कोटी खर्च करीत असून हा संपुर्ण प्रकल्प शासनाकडुन मिळवलेल्या २ हेक्टर ९० आर या भुखंडावर प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे अशी माहीती दिली. यावेळी नगर परिषदचे प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, मुख्याधिकारी बबन तडवी, नगर परिषदचे वरिष्ठ अभियंता सईद रवाटीक, प्रकल्प अभीयंता वाय. बी. मदने, रमाकांत मोरे, सामाजीक कार्यकर्ता धिरज महाजन, प्रकल्पाचे ठेकेदार आर. डी. पाटील यांच्यासह आदी उस्थितीत होते. संपुर्ण प्रकल्प हा पुढील फेब्रवारी महीन्याच्या अखेरीस पुर्ण होण्याची शक्यता असल्याची माहीती नगर परिषद सुत्रांकडुन मिळाली आहे.