यावल प्रतिनिधी । यावल सेंट्रल बँक व्यवस्थापकाची आदीवासी ग्राहकाशी अपमानास्पद व उद्धटपणाची वागणुक केल्याप्रकरणी ग्राहकांनी बँक विभाग व्यवस्थापक जळगाव यांच्याकडे ई-मेल द्वारा तक्रार दाखल केली आहे.
याबाबतची मिळालेली माहीती अशी की, परसाडे तालुका यावल येथील मजीत अरमान तडवी हे १२उ जानेवारी २०२१ रोजी यावल शाखेत त्यांच्या कामासाठी गेले असता बँकेचे कामकाजाच्या वेळेत तीन वाजेच्या आधी व्यवस्थापक यांनी कार्यालयाचा दरवाजा बंद करून टाकला व वेळ संपली असे सांगून मजीत अरमान तडवी यांनी सांगितले की माझा पगार जमा झाला आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी बँक खाते केवायसी कागदपत्र सादर केले होते. त्यानंतर पुढील कार्यवाही खात्यातील शिल्लक रकमेची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. यावेळी बँकेच्या गेटला दुपारी तीन वाजेपासून कुलूप लावलेल्याचे दिसुन आले असता तडवी यांनी बँकेचे व्यवस्थापक साहेबांना दरवाजातून विचारणा केली असता त्यांनी अतिशय खुन्शीवृत्तीने व बुद्धीने तडवी यांच्याशी जोरात आरडा ओरड सुरू केली.
उद्धटपणाची वागणुक देवुन तुमच्या बापाची बँक आहे ? आता कोणाचा बापाला तरी तुला माहिती देणार नाही जास्त बोलुन विचारणा केल्यास तुमच्यावर बँकेत दरोडा टाकण्यास आल्याचे दाखवुन तुला जेलमध्ये लागेल व तुझी बँक खाते बंद करून टाकेल असे धमकावले हिंदी भाषेत मराठी भाषेत अतिशय अपमानास्पद घाणेरड्या भाषेत वागणूक देऊन अपमान केला. याबाबत संभाषणाची केले असून लोक खाते बंद करून असभ्य वर्तन करीत आहे. अश्या धमक्या दिल्या मजीत तडवी यांचे बँकेत वैयक्तिक खाते असून ,शाखा व्यवस्थापक यांच्या वागणुकीबद्दल मजिद तडवी यांनी विभागीय कार्यालय जळगाव रिजनल मॅनेजर सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडे तक्रार केली असून अशा प्रकारच्या असंख्य चुकीमुळे या बँकेचे व्यवहाराविषयी शहरात अनेक तर्कवितर्क निघत आहे.