जळगाव (प्रतिनिधी)। शिवाजी नगरातील हरीजन कन्या छात्रालय या शाळेत मुळजी जेठा महाविद्यालयातील सोहम योग आणि निसर्गोपचार केंद्रातर्फे गुरूवार 28 फेब्रुवारी रोजी आयोजित योगशिबीर कार्यक्रम उत्साहात पार पडला. योवळी दहा ते अठरा वयोगटातील मुलींना सुर्यनमस्कार, प्राणायाम, ओंकार साधना घेण्यात आले.
योगशिबीराच्या माध्यमातून योगाची आवड व योगाविषयी सोहम योग आणि निसर्गोपचार विभागातील एम.ए.च्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनी अंजली पाटील आणि डॉ. स्नेहल पाटील यांनी मार्गदर्शन केले. ‘मानसिक स्वास्थ्यावर सकारात्मक परीणाम’ व्हावा व हिमोग्लोबीनची पातळी वाढावी. यासाठी हे शिबीर घेण्यात आले. योगीक सायन्सच्या अभ्यासक्रमातील भाग म्हणून अंजली पाटील आणि डॉ. स्नेहल पाटील यांनी योग शिबीर घेतले. यावेळी सोहम योगाच्या विभागप्रमुख डॉ.सौ.आरती गोरे, प्रा.सौ.गितांजली भंगाळे यांनी वेळोवळी सहकार्य व मार्गदर्शन केले.