जळगाव, प्रतिनिधी | श्री स्वामी समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिरचा विद्यार्थी अंकित सुनील पाटील याने शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत यश प्राप्त केले आहे.
त्याच्या यशाबद्दल संस्थापक गुलाबराव देवकर, अध्यक्ष प्रतापराव पवार, सचिव गोपाळराव देवकर, विशाल देवकर, विकासराव निकम, मुख्याध्यापक सुरेखा महाजन यांनी गौरव केला. त्यास संदीप मोरे सरांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तो पिंप्राळा येथील बिजासनी मेडिकल अँड जनरल स्टोअरचे संचालक सुनील युवराज पाटील आणि सौ. उषा पाटील यांचा मुलगा आहे. त्याच्या यशाबद्दल शाळेतील गुरुजनांनी, आप्तेष्ठांनी तसेच परिसरातील नागरिकांनी त्याचे कौतुक केले आहे.