बारावीचा निकाल जाहीर; ९९.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे । महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. यानुसार राज्याचा 12 वी निकाल 99.63 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. 

 बारावीचा राज्य मंडळाचा निकाल 99 .63 टक्के लागला आहे. त्यात विज्ञान शाखेचा निकाल 99.45 टक्के वाणिज्य शाखेचा 99 .91 टक्के तर कला शाखेचा 99.83 लागला.शंभर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 46 तर 12  विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण मिळाले आहे. कोकणचा सर्वाधिक 99.81 टक्के आणि औरंगाबाद 99.34 टक्के सर्वात कमी असा निकाल लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निकालात ८.९७ टक्के वाढ झाली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे दहावी,अकरावी आणि बारावीतील अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारे बारावीचा अंतिम निकाल जाहीर केला  आहे. यंदा बारावी परीक्षेसाठी 13 लाख 17 हजार 76 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार केलेला नाही.या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारसाठी एक संधी उपलब्ध राहिल,असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Protected Content