धरणगाव, प्रतिनिधी । येथे दरवर्षी श्री मरीमातेच्या यात्रेनिमित्त श्रावण महिन्यात श्री व्यायाम प्रसारक मंडळातर्फे भव्य कुस्त्यांची दंगल आयोजन केले जाते. परंतु, यावर्षी देशावर, राज्यावर कोवीड१९ कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने प्रसार होऊ नये यासाठी दक्षता म्हणून केंद्र व राज्य सरकार ,प्रशासनाचे आदेशाचे पालन करून यावर्षीचा कुस्त्यांचा दंगलीचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय मंडळाच्या ठराविक सदस्यांच्या उपस्थितीत घेतला आहे.
श्री व्यायाम प्रसारक मंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुस्त्यांची दंगल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी श्री मरिमातेचे व श्री बजरंगबलीच्या प्रतिमेचे पूजन येत्या मंगळवारी दि.२१ जुलै रोजी सकाळी १० वाजता श्री मरिमातेच्या मंदिरात करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीस मंडळाचे अध्यक्ष भानुदास विसावे, सचिव प्रशांत वाणी, खजिनदार कमलेश तिवारी, गुलाबराव वाघ, सुरेश चौधरी, भास्कर मराठे, देवीदास महाजन, प्रकाश पाटील ,सुनिल चौधरी, किरण वाणी, किशोर पहिलवान, गोपाल पाटील उपस्थित होते.