बोरखेडा येथे युवा नेते मंगेश चव्हाण यांच्या हस्ते अनोख्या उपक्रमाचे पूजन (व्हिडीओ)

mangeshdada

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालूक्यातील बोरखेडा येथे लोक सहभागातुन तीन किलोमीटर दूर असलेल्या तितुर नदीतून केटी वेअरच्या सहाय्याने बोरखेडा गावातील कोरड्या झालेल्या नाल्यात पाणी लिफ्ट करुन आणण्यात आले आहे. या पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सुटनार आहे. रविवारी युवा नेते मंगेश चव्हाण यांनी या उपक्रमाचे श्रीफळ फोडून पूजन केले.

 

या आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी युवा नेते मंगेश चव्हाण मित्र परिवाराने लोक सहभागातुन पाणी गावापर्यंत आणले आहे. त्याचवेळी गावात वृक्षारोपण करुन ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेशही मंगेश चव्हाण यांनी ग्रामस्थांना दिला. यावेळी ग्रामस्थांनी युवा नेते मंगेश चव्हाण हे शब्द देऊन पाळणारा नेता असल्याने त्यांचे विशेष आभार मानले. या कार्यक्रमास उप सरपंच सतीश पाटील, माजी सरपंच धनजंय पाटील, माजी सरपंच रामकृष्ण पाटील, माजी उपसरपंच सुरेश पाटील, माजी उप सरपंच रावसाहेब पाटील, सुदाम पाटील, निंबा पाटील, छोटू पाटील, रघुनाथ पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जितेंद्र नेरकर यांनी केले तर आभार पोलिस पाटील शरद पाटील यांनी मानले.

 

 

Protected Content