नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जीएसटीमुळे गेल्या १० महिन्यांपासून वाहनांची विक्री घटली आहे. त्यामुळे ऑटो पार्ट्स क्षेत्रातील १० लाख नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
ऑटो मोबाईल उद्योग वाढल्यावर ऑटो पार्ट्स क्षेत्रालादेखील गती मिळते. मात्र सध्या वाहनांना मागणी नाही. वाहनांची विक्री १५ ते २० टक्क्यांनी घटली आहे. त्याचा थेट परिणाम ऑटो पार्ट्स क्षेत्रावर झाला आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास १० लाख कामगारांचा रोजगार जाईल,’ अशी भीती एसीएमएचे अध्यक्ष राम व्यंकटरमणी यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर, अशा प्रकारची समस्या याआधी कधीही उद्भवली नव्हती,’ असेही त्यांनी सांगितले. ऑटो पार्ट्स क्षेत्रात जवळपास ५० लाख कामगार काम करतात. जीएसटीमुळे गेल्या १० महिन्यांपासून वाहनांची विक्री घटली आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राचा भाग असणाऱ्या सर्व उद्योगांवर सारखाच जीएसटी लावण्याची मागणी ऑटोमोटिव्ह कंपोनन्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून (एसीएमए) करण्यात येत आहे.