जामनेर येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा सामान्य ग्रामीण रुग्णालयामध्ये विश्व शांती दीव्यांग बहुउद्देशीय संस्था जामनेर, भारतीय जनता पक्ष दिव्यंग सेल तालुका जामनेर, अपंग पुनर्रचित विकास बहुउद्देशीय संस्था जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रामीण रुग्णालय जामनेर येथील रुग्णांना फळ वाटप करून दिव्यांग बांधवांनी जागतिक दिन असा साजरा केला.

यावेळी संस्थेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते एवढी संस्थेचे अध्यक्ष पवन भाऊ माळी, बीजेपी दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष गणेश भाऊ साळुंखे, बीजेपी दिव्यांग सेलचे तालुका उपध्यक्ष व संजय गांधी निराधार चे सदस्य निलेश भाऊ सिसोदे, संस्थेचे जागृती व्यंग संघटनेचे सचिव युवराज मगरे, सहसचिव दरबार सिंग चव्हाण, शहराध्यक्ष मोहन मामा सुरवाडे, शालिक भाऊ, महाले, प्रदीप भाऊ अशा संख्या पदाधिकारी उपस्थित होते. फळे वाटप करताना ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते.

Protected Content