भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळ जेसीआई भुसावळ, ताप्ती रोटरी क्लब, रेल सिटी इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ आणि सोन्याच्या ड्रॉइंग क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ शहरातील संतोषी माता हॉल येथे रविवारी ३ सप्टेंबर रोजी पर्यावरण पूरक शाडू मातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते गणरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दीप प्रजनन केल्यानंतर कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली.
या कार्यशाळेत ५०० हून अधिक मुला मुलींनी सहभागी घेतला होता. यावेळी जेसीआय व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, सचिव जयश्री अग्रवाल, प्रतिष्ठा महिला मंडळ सचिव लता सोनवणे, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी अध्यक्ष मनोज सोनार, सचिव तेजस नवगाळे, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी अध्यक्ष रेवती मांडे, सचिव सीमा सोनार ,सोनिच्छा ड्रॉईंग क्लास संचलिका जयश्री चौधरी यांनी कार्यक्रमास सहकार्य केले.