“कुष्ठरोग जनजागृती व मानवाधिकार”वर कार्यशाळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग निवारण संस्था पुणे आणि सहाय्यक संचालक कुष्ठरोग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी जळगाव इस्ट यांनी कुष्ठरोग जनजागृती व मानवाधिकार या विषयावर ४ व ५ सप्टेंबर अशी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली.

या कार्यशाळेच्या शुभारंभासाठी आमदार राजूमामा भोळे व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिनिधी, त्यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील, प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी रोटरी अध्यक्ष वर्धमान भंडारी, सुरेश घोंगडे जगतीक आरोग्य संघटना पुणे व डॉ. नितीन भालेराव सहसंचालक, कुसूम, पुणे महाराष्ट्र शासन (कुष्ठ मुक्त महाराष्ट्र) व डॉ. जयवंत मोरे सह. संचालक कुष्ठरोग जळगाव यांनी या योजनेची माहिती दिली.

कार्यशाळेमध्ये कर्मचारी, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कृष्ठरोगींच्या झोपटपट्टीत असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी, शौचालय, रस्ते, विज, आरोग्य सेवा याविषयी चर्चा झाली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. इरफान तडवी व आभार प्रदर्शन प्रकल्प प्रमुख रजनिश लाहोटी यांनी केले. कुष्ठरोगाविषयी असलेल्या समस्या रोडवण्याचे आश्वासन आमदार राजूमामा भोळेयांनी दिले. या कार्यशाळेमध्ये डॉ. नितीन भालेराव, डॉ. सुरेश घोडगे, डॉ. प्रज्ञा जाधव व इतर मान्यवरांनी कुष्ठरोगाविषयी जनजागृतीचे मार्गदर्शन केले. मानवरांचे शरद भोसले (कार्यकारी संचालक, आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग निवारण संस्था) यांनी सर्वांचे आभार मानले.

Protected Content