Home Cities जळगाव विद्यापीठात ‘मुलाखत तंत्र’ विषयावर कार्यशाळा

विद्यापीठात ‘मुलाखत तंत्र’ विषयावर कार्यशाळा

0
34

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षामार्फत विद्यापीठाच्या विविध प्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी  “मुलाखत तंत्र” या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेत जळगाव येथील बेंझो केमिकल्स लि.चे मनुष्यबळ व्यवस्थापक आनंद शिरगावकर यांनी मुलाखतीची पूर्व तयारी कशी करावी, मुलाखतीसाठी  ड्रेसकोड, नीटनेटकेपणा, आत्मविश्वासपूर्वक उत्तरे देणे, संवाद कौशल्य तसेच आदर्श परीचय पत्र कसे तयार करावे आदी विषयांवर  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव प्रा.किशोर पवार, समन्वयक प्रा.रमेश सरदार व प्लेसमेंट ऑफीसर सोनाली दायमा यांनी व्यवस्थापन केले. शनिवारी, ३० एप्रिल रोजी ही कार्यशाळा विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात घेण्यात आली. एकूण १८० विद्यार्थी या कार्यशाळेत उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound