Home Cities जळगाव गोदावरी महाविद्यालयात विद्युत वाहन आणि सोलर सिस्टिमवर कार्यशाळा !

गोदावरी महाविद्यालयात विद्युत वाहन आणि सोलर सिस्टिमवर कार्यशाळा !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्युत वाहन आणि सोलर सिस्टिमकडे सध्याचा कल यावर एक दिवसीय राज्यस्तरीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तंत्रनिकेतन विद्युत विभागाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेचा उद्देश शिक्षकांना इलेक्ट्रिकल व्हेईकल (EV) आणि सोलर सिस्टिमसारख्या महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर जागरूकता प्रदान करणे होता.

कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी व्ही. के. खाचणे (निवृत्त अधिक्षक अभियंता) आणि कौशिक वाघुळदे (कुमार इलेक्ट्रिकल, जळगाव) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील होते. तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे, तंत्रनिकेतन अधिष्ठाता प्रा. नितीन पाटील, विद्युत विभाग प्रमुख प्रा. चेतन विसपुते आणि इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. व्ही. के. खाचणे यांनी सायंकाळी सत्रात इलेक्ट्रिकल व्हेईकलसंबंधी मार्गदर्शन केले. त्यांनी इलेक्ट्रिकल व्हेईकलचे भाग, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम, चार्ज कंट्रोलर, तसेच बॅटरी चार्जिंगसाठी येणाऱ्या समस्यांवर उपायांची चर्चा केली.

दुपारच्या सत्रात कौशिक वाघुळदे यांनी सोलर सिस्टिम, सोलर पॅनल, चार्ज कंट्रोलर, ऑन-ग्रीड आणि ऑफ-ग्रीड सिस्टीममधील फरक, तसेच सोलर पॅनलची साफसफाई आणि नेट मीटरिंग याबाबत माहिती दिली.या कार्यशाळेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक व परिसरातील इतर तंत्रनिकेतनच्या शिक्षकांनी सक्रियपणे सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रिया इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. दीपक झांबरे यांनी केले. कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेचा उद्देश शिक्षकांना सध्याच्या तंत्रज्ञानावर उत्तम मार्गदर्शन मिळवून त्यांची कौशल्ये वर्धित करणे, तसेच नव्या तंत्रज्ञानाबद्दल अधिक माहिती देणे होता. यामुळे शिक्षकांचा तांत्रिक ज्ञानात वृद्धी होऊन ते विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यास सक्षम होतील.


Protected Content

Play sound