अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवाना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी मराठी वाड्मय मंडळाच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा सोमवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जसनसंपर्क महासंचनालयातून माहिती संचालक या पदावरून सेवानिवृत्त झालेले देवेंद्र भुजबळ हे अनमोल मार्गदर्शन करून पत्रकार बांधवांच्या विविध शंकांचे निरसन करणार आहेत. तरी सर्व पत्रकार बांधवांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मराठी वाड्मय मंडळ,नांदेडकर सभागृह येथे करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांसाठी खुली असेल असे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सचीव चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.