नाशिक, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावरुन, काल ज्या ठिकाणी बोर्ड लावण्यात आले. ते काम आधीपासूनच सुरु आहे. परंतु नाशिक जिल्ह्यात अगोदरपासूनच सुरु असले तरी या विकास कामांचे श्रेय शिवसेना घेत असल्याची टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांना भेट देऊन तिथल्या नागरिकांच्या समस्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जाणून घेत आहेत. विविध ठिकाणी सुरु असलेल्या विकास कामांचा आराखडा आढावा आदित्य ठाकरे शिवसेना नेत्यासमवेत घेत आहेत. काम सुरु झाल्यानंतर तिथल्याच लोकांकडून काही तरी सांगितल्या नंतर आदित्य ठाकरें या भागाचा दौरा करण्यासाठी इथे आले. यात त्यांची काही चूक नाही. काम अगोदरच सुरु झालेले असते. पण बोर्ड लावून जनतेला दाखवायचे की हे काम शिवसेनेने केले. हे बरोबर नाही. अशी टीका अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
आदित्य ठाकरेंच्या आदीवासी परिसरातील दौऱ्यादरम्यान पाणीपुरवठा योजना, सिंचन व पर्यावरणाच्या बाबतीत आढावा घेऊन प्रस्तावित नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती देण्याच्या सूचना देऊन वर्षभरात योजनेचे काम पूर्ण करण्याचे आदेश आदित्य ठाकरे यांनी दिले. पण, हि कामे याअगोदरच सुरु होती, या कामांची ठाकरे यांनी चौकशी करावी. यामुळे जिल्हा प्रशासन, ग्राम विकास खाते काहीच काम करत नाही का असा त्याचा अर्थ होतो,असेही ना. भुजबळ म्हणाले.