Home Cities चोपडा गरजू लोकांपर्यंत पोहोचून काम करा !: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे

गरजू लोकांपर्यंत पोहोचून काम करा !: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी उल्लेखनीय काम केले आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून काम न करता प्रत्यक्ष मैदानावर उतरून गरजू नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, असे आवाहन केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

रक्षा खडसे म्हणाल्या, “अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री काम न करता, प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवल्यास त्यांनाही समाधान मिळेल आणि आपल्यालाही काम केल्याचे समाधान लाभेल.” जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. मात्र, अधिकाऱ्यांनी अधिक सक्रिय होऊन लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हा प्रशासनातील विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी रक्षा खडसे यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच, अधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले.


Protected Content

Play sound