जळगाव (प्रतिनिधी) अमृतधारा फाऊंडेशन आणि खान्देश साहित्य परिषदेतर्फे महिला दिनानिमित्त जयनगरात खास महिलांसाठी बहुभाषिक कवयित्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
अमृतधारा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.प्रियंका सोनी आणि इंदिरा जाधव यांनी आयोजित केलेल्या या संमेलनाच्या सुरुवातीला सर्व महिलांच्या हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.उषा शर्मा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाला सुरुवात करण्यात आली. समाजात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराला, महिलांच्या मनातील दुःखाला उपस्थित कवयित्रींनी आपल्या कवितांच्या माध्यमातून मांडले. मराठी, हिंदी, उर्दू, गुजराथी भाषेतील काव्य सादर करीत महिलांची सर्व रूपे आणि जबाबदारी समोर मांडण्यात आली. यावेळी डॉ.प्रियंका सोनी, सुनीता शर्मा, डॉ.शकुंतला चौहान, मीना बियाणी, डॉ.दिपा लोढा, जयश्री काळवीट, शकुंतला मिश्रा, गीता सोनी, के.यु.शेख, उषा शर्मा, पुष्पलता कोळी, राजी नायर, हीना सोनी, विजया पांडे, इला सोनी, सिमा दोषी, माया अहिरे, रिता भल्ला, इंदिरा जाधव यांनी आपले काव्य सादर केले. संमेलनाचे सूत्रसंचालन डॉ.प्रियंका सोनी यांनी तर आभार खान्देश साहित्य परिषदेच्या अध्यक्षा इंदिरा जाधव यांनी मानले.