Home आरोग्य शासकीय योजनेच्या शौचालयासाठी महिलेचे उपोषण सुरू

शासकीय योजनेच्या शौचालयासाठी महिलेचे उपोषण सुरू

0
24

पाचोरा प्रतिनिधी । स्वत:च्या घराजवळ शासकीय योजनेतील शौचालय बांधण्यास गावातील ठराविक नागरिक अटकाव करीत असुन वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पिडीत महिलेचे दि. १९ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. 

डांभुर्णी ता. पाचोरा येथील रहिवाशी प्रतिभा प्रेमसिंग परदेशी यांचे गावात स्वत:च्या मालकीचे घर असुन त्या घराजवळ शासकीय योजनेतील शौचालय बांधण्याकामी गावातीलच संतोष शिवलाल परदेशी व शांतीलाल महाविर परदेशी हे विनाकारण अटकाव व मज्जाव करत असल्याने अखेर त्यांच्या या त्रासाला कंटाळून आणि स्व मालकीचे शौचालय बांधण्यासाठी प्रतिभा परदेशी यांनी पंचायत समिती समोर उपोषणाला बसल्या आहेत. या संदर्भात प्रतिभा परदेशी यांनी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक (पाचोरा),  सरपंच / ग्रामसेवक (डांभुर्णी), सहाय्यक पोलिस निरीक्षक (पिंपळगाव हरेश्वर) यांना उपोषणाला बसण्याबाबत पत्र दिले आहे.


Protected Content

Play sound