जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिका आणि आनंदीप यांच्या संयुक्त विद्यमानाने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आज गुरूवार १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता महापालिकेत महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याहस्ते ‘सन्मान नवरत्नांचा’ या अंतर्गत विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
पुरूषांच्या बरोबरीने स्त्रीयांनी देखील खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहे. जळगाव शहरातही शासकीय व निमशासकीय सेवेत काम करणाऱ्या महिलांची संख्या कमी नाही. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिका आणि आंनदीप संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आज गुरूवार १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता महापालिकेतील महापौर जयश्री महाजन यांच्या दालनात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कतृत्ववान महिलांचा महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.
या सन्मान कार्यक्रमात बालकिर्तनकार माईसाहेब महाराज, सहय्यक पोली निरीक्षक माधुरी नारखेडे, पोलीस कॉन्स्टेबल मेघना जोशी, बस वाहक निलिमा पाटील, ॲड. वैशाली बोरसे, डॉ. कमल सुखसागर, परिचारीका संगिता वसावे, स्वच्छता महिला कर्मचारी मनिषा जावळे, शिक्षीका सुनिता वाघ, समाजसेविका भारती कुमावत, बेघर आश्रमच्या संचालिका मिराबाई सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सेवाधर्म संस्थेचे चंद्रशेखन नेवे, दिपाली कासार, सुवर्णा चाळसे यांच्यासह सत्कारमुर्ती महिला उपस्थित होत्या.