Home क्राईम गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार; औरंगाबादच्या नगरसेवकावर गुन्हा

गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार; औरंगाबादच्या नगरसेवकावर गुन्हा


पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवक सय्यद मतीन याच्यावर पिंपरी चिंचवडच्या चाकण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये देखील त्याच्यावर आधी एक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

 

 

पिडीत महिलेने फिर्यादीत म्हटले आह की, सय्यद मतीनचा मेहुना हामीद सिद्दीकी आणि भाऊ मोहसीन रशिद सय्यद यांच्यावरही विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा दावा या महिलेने केला आहे. तक्रारदार महिला चाकणमध्ये राहते. सय्यद मतीनने आपल्याला राहत्या घरातून नेत अनेक ठिकाणी बलात्कार केल्याचे तिने म्हटले आहे. 26 नोव्हेंबर 2018 ते 24 फेब्रुवारी 2019 या काळात लोणावळ्याच्या वॉटर पार्क, कृष्णानगर रेसिडेंसी, बारामती, टाऊनहॉल, शरणापूर येथ गिरीजा लॉजिंग आणि औरंगाबादच्या हर्सुल इथल्या घरात आरोपींनी गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवत कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचे महिलने सांगितले आहे. दरम्यान, सय्यद मतीन हा एमआयएमचा वादग्रस्त नगरसेवक असून पक्षविरोधी कारवाई केल्याने त्याची हकालपट्टी केलेली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound