पाचोरा (प्रतिनिधी) आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. मात्र, ग्रामीण भागातील महिलांनी रोजगारावर अवलंबून न राहता लहामोठ्या व्यवसायात लक्ष घातले पाहिजे,असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या स्वाती शिंदे यांनी केले. त्या जागतिक महिला दिनानिमित्त गरजूंना मदत वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.
आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आधारवड या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या स्वाती गणेश शिंदे यांनी सामाजिक दृष्टीकोन समोर ठेवून गरजूंना मदत करून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून स्त्री सखी संस्थेच्या रेखा पाटील या होत्या. यावेळी या संभाजी राजे युवा फाऊंडेशनचे प्रवीण पाटील, भूषण देशमुख, महेंद्र अग्रवाल, बबलू पाटील, राहुल पाटील आदी उपस्थिती होते.