जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | देशात महिलांवर होणारे अन्याय अजुनही थांबलेले नाही तेव्हा महिलांना आपला आत्मसन्मान टिकवुन ठेवण्यासाठी व आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी महिला सक्षमीकरण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भोकरीकर लिगल सर्व्हेसिसच्या संचालिका व विधी सल्लागार ॲड. रूपाली महेश भोकरीकर यांनी केले महिला सक्षमीकीकरण व महिला सुरक्षितता या विषयावर त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
यावेळी शासकीय औदयागिक महिला प्रशिक्षण संस्थेतील विदयार्थीनींनी यावेळी संवाद साधला संस्थेचे गटनिर्देशक श्री. व्ही.एच. कुमावत यांच्याकडुन ॲड. रूपाली भोकरीकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पी.एल. तायडे यांनी सुत्रसंचलन केले श्रीमती भंगाळे सौ. पांडे सौ.निता सानप व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.