यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शासनाने मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना आज पासून कार्यान्वित केली असुन, योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असुन पहील्याच दिवसी अर्ज करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रांसाठी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद या ठिकाणी मोठी गर्दी दिसुन आली या योजनेचे लाभ मिळवण्यासाठी तलाठी कार्यालय, नगर परिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालय वसुविधा केन्द्रांवर मोठी गर्दी उसळली होती.
दरम्यान या योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळवण्यासाठी राज्य शासनाने अनेक अटीशर्ती लागू केलेले आहेत त्यात प्रामुख्याने डोमेसाईल आणि जन्माचा दाखला या कागदपत्रांची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे जन्माचा दाखला काढण्यासाठी आणि डोमेसाईल काढण्यासाठी एक आठवडा कमीत कमी या महिलांना लागणार आहे कागदपत्र समाविष्ट करण्यासाठी १५ जुलै २०२४ पर्यंत ठेवण्यात आली असुन हा कालावधी अत्यंत अल्प वेळ आहे. त्यामुळे बहुसंख्य महिला यापासून दुरावतील असे दिसून येत आहे आजपासूनच मोठी गर्दीत होत असताना दिसून येत आहे सध्या ऑनलाइनचे नेट व्यवस्थित चालत नाहीत त्यामुळे बँकांचेच नव्हे तर सर्वच प्रकारच्या बाबींचे प्रकरणे विलंबित होत आहेत त्यातच डोमेसाईल काढण्यासाठी किमान चार दिवसाचा तरी वेळ लागतो असे सेतू सुविधा केंद्र संचालकांकडून बोलले जात आहे या सर्व प्रकारात महिलांचा एक आठवडा निकामी जाण्याची शक्यता आहे. या बाबींचा शासनाने विचार करून यावर तोडगा काढावा अशी मागणी महिला वर्गातून होत आहे