Home Cities अमळनेर महिलेचे बंद घर फोडून ८० हजारांच्या दागिन्यांची चोरी !

महिलेचे बंद घर फोडून ८० हजारांच्या दागिन्यांची चोरी !

0
187


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील भोईवाडा परिसरात एका घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी, २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. यासंदर्भात बुधवारी, २७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्योतीबाई शामराव चौधरी (वय ४५, रा. भोईवाडा, अमळनेर) या आपल्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांचे घर २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश केला. घरातून त्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केले. ज्योतीबाई घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.

घडलेली घटना लक्षात आल्यानंतर ज्योतीबाई चौधरी यांनी तात्काळ अमळनेर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पवार हे करत आहेत.


Protected Content

Play sound