महिलेचे ४ लाख ३२ हजारांचे दागिने लांबविले

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुणे ते जळगाव दरम्यानच्या प्रवासात महिलेच्या जवळील पर्स मधून ४ लाख ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून येण्याची धक्कादायक घटना रविवारी २३ मार्च रोजी दुपारी ४ वाजता समोर आले आहेत. या संदर्भात सोमवारीत २४ मार्च रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, आशा विकास कुलकर्णी (वय-५०, रा. त्रंबक नगर महाबळ जळगाव) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान त्या नातेवाईकांकडे पुणे येथे गेले होते. त्यानंतर पुणे ते जळगाव असा लक्झरीने प्रवास करत असताना प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी ४ लाख ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर आशा कुलकर्णी यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी २४ मार्च रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सलीम तडवी करीत आहे.

Protected Content