Home क्राईम कल्याणमध्ये मुलीची छेड काढणाऱ्याला महिलांचा चोप

कल्याणमध्ये मुलीची छेड काढणाऱ्याला महिलांचा चोप


 

Beat
 

कल्याण (वृत्तसंस्था) शहरातील अटाळी परिसरात १९ वर्षीय मुलीची छेड काढून शरीर सुखाची मागणी करणाऱ्याला महिलांनी चांगलाच चोप दिला आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, धीरज राजपूत (वय ५५) दररोज पिडीत मुलीकडे शारीरिक सुखाची मागणी करायचा. याबाबत पिडीत मुलीने आपल्याला आईला सांगितले. त्यानंतर महिलेने धीरजला खांबाला बांधून चांगलाच चोप दिला. त्यानंतर धीरजची धींड काढत खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. धीरजविरोधात ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर मारहाण करणाऱ्या महिलांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound