Home क्राईम बसस्थानक आवारातून महिलेचे सोन्याच्या बांगड्या लांबविल्या !

बसस्थानक आवारातून महिलेचे सोन्याच्या बांगड्या लांबविल्या !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील नवीन बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला हातसफाई दाखवण्यास सुरुवात केली आहे. बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा लाभ घेत एका ४२ वर्षीय महिलेच्या हातातील ६५ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील धनवडी गावातील रहिवाशी असलेल्या लीला जगदीश पाटील (वय ४२) या महिला ९ मार्च रोजी जळगाव शहरात आल्या होत्या. दुपारी २ वाजेच्या सुमारास त्या नवीन बसस्थानकावरून चोपडा जाणाऱ्या बसमध्ये (क्र. MH 20 BL १८७६) चढत होत्या. बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने लीलीबाईंच्या हातातील ६५ हजार रूपये किंमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी चोरून नेली. काही वेळाने दागिन्याची चोरी झाल्याचे लक्षात येताच लीलाबाईंनी परिसरात शोधाशोध केली, मात्र चोरटा पसार झाला होता. अखेर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक रुस्तम तडवी करत आहेत.


Protected Content

Play sound