Home क्राईम भांडण सोडवणे महिलेला पडले महागात; हात फ्रॅक्चर

भांडण सोडवणे महिलेला पडले महागात; हात फ्रॅक्चर


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील यशवंत नगरातील कंडारी गावात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेचा हात मुरगडल्यामुळे फ्रॅक्चर होवून दुखापत केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बुधवारी १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदा अशोक जाधव वय ४५ रा. कंडारी, ता.भुसावळ ह्या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. १९ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गावात राहणारे त्यांचे नातेवाईक यांच्यात आपापसात भांडण सुरू होते. त्यावेळी सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी नंदा जाधव पुढे गेल्या. त्यावेळी वसुबाई सुर्यवंशी रा.अमळनेर या महिलेने नंदा जाधव यांचा हात मुरगडला त्यामुळे त्यांच्या हात फ्रॅक्चर झाला आहे. जखमी झालेल्या नंदा जाधव यांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार घेतल्यानंतर त्यांनी बुधवारी १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वसुबाई सुर्यवंशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ संजय सोनवणे हे करीत आहे.


Protected Content

Play sound