जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव बसस्थानक आवारातून महिला ही आपल्या तीन वर्षाच्या मुलाला सोबत घेवून बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी २९ मे रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. बेबाबाई योगेश बाविस्कर वय २३ आणि भाग्येश योगेश बाविस्कर वय ३ दोन्ही रा. कढोली ता. जळगाव असे बेपत्ता झालेल्या मायलेकाचे नाव आहे.
जिल्हापेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील कढोली गावात बेबाबाई योगेश बाविस्कर या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता बेबाबाई या त्यांच्या आई रत्ना शत्रुघन कोळी आणि मुलगा भाग्येश बाविस्कर यांच्यासोबत जळगाव येथील बसस्थानक येथे आलेले होते. त्यावेळी पाण्याची बाटली घेवून येते असे आई रत्ना कोळी यांना सांगून बेबाबाई बाविस्कर यांनी मुलगा भाग्येस याला सोबत घेवून बेपत्ता झाल्या. त्यानंतर त्यांच्याआईने दोघांचा सर्वत्र शोध घेतला परंतू त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी २९ मे रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे हे करीत आहे.