Home क्राईम वहिनीचे भांडण सोडवताना महिलेचा विनयभंग

वहिनीचे भांडण सोडवताना महिलेचा विनयभंग


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वहिनीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका ४८ वर्षीय महिलेच्या अंगावरील कपडे फाडून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या ४८ वर्षीय पीडित महिला बस महामंडळ विभागात वाहक म्हणून नोकरी करतात. त्यांची वहिनी गोकुळ स्विटमार्ट परिसरात राहतात. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पीडित महिला आपल्या वहिनीकडे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या वहिनीसोबत प्रशांत किसन गवळी आणि सुहानी प्रशांत गवळी (दोघे रा. वरणगाव) यांचे भांडण सुरू होते.

पीडित महिला हे भांडण सोडवण्यासाठी पुढे सरसावल्या असता, संशयित आरोपी प्रशांत गवळी याने महिलेच्या अंगावरील कपडे फाडून तिचा विनयभंग केला. त्याच वेळी, सुहानी गवळी हिने पीडित महिलेचे केस ओढून त्यांना दुखापत केली.

या प्रकारानंतर पीडित महिलेने तात्काळ जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार, रात्री १० वाजता प्रशांत गवळी आणि सुहानी गवळी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल अलका शिंदे करत आहेत.


Protected Content

Play sound