जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावाजवळ शिवारात एका ३९ वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुलै महिन्यात घडलेल्या या प्रकाराबाबत मंगळवारी, १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी ३९ वर्षीय महिला जुलै महिन्यात (तारीख निश्चित नाही) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शेतात शिवारात पायी जात होती. त्याचवेळी त्यांच्या गावात राहणारा संशयित आरोपी दगडू रघुनाथ कोळी हा दुचाकीवरून तिथे आला. त्याने महिलेला दुचाकीवर बसवले आणि रस्त्याने जात असताना एका केळीच्या शेताजवळ दुचाकी थांबवली. तिथे त्याने महिलेसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला.

या प्रकारानंतर पीडित महिलेने तात्काळ जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेली घटना पोलिसांना सांगितली. तिच्या तक्रारीवरून मंगळवारी, १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता संशयित आरोपी दगडू रघुनाथ कोळी याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे करत आहेत.



