जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील खान्देश मिल कॉलनी परिसरातील एका भागात राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेला अश्लिल शिवीगाळ करून विनयभंग केला तर तिच्या कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील खान्देश मिल कॉलनी परिसरातील एका भागात ३४ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्याच भागात राहणारा संशयित आरोपी नारायण गोपाल (वय-६५) याने कारण नसतांना महिलेला अश्लिल शिवीगाळ करत विनयभंग केला. तसेच महिलेसोबत धक्काबुक्की करत तिच्या कुटुंबाला मारहाण केली.
सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नारायण गोपाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख करीत आहेत.