अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील निसर्डी शिवारातील शेतात पतीला मारहाण करत असतांना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील निसर्डी गावात ४० वर्षीय महिला ही आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. सोमवारी २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता निसर्डी शिवारातील शेतात काम करत असतांना चुनिलाल धनराज पाटील व त्याची पत्नी मनिषा चुनिलाल पाटील या दोघांनी महिलेच्या पतीला लाकडी काठीने मारहाण करत होते. यावेळी महिला ही भांडण सोडविण्यासाठी गेली असता चुनिलाल पाटील याने महिलेला शिवीगाळ करत हात पकडून विनयभंग केला. ही घटना घडल्यानंतर पिडीत महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात चुनिलाल धनराज पाटील आणि मनिषा चुनिलाल पाटील दोन्ही रा.निसर्डी ता.अमळनेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कैलास शिंदे हे करीत आहे.