जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरालगत असलेल्या कुसुंबा गावातील एका भागात ३१ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार शनीवारी १४ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली आहे. याबाबत रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरपासून जवळ असलेल्या कुसुंबा गावातील एका भागात ३१ वर्षीय महिला ही वास्तव्याला आहे. शनीवारी १४ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास गावातील स्वामी समर्थ बैठक हॉलजवळ पिडीत महिलेच्या मावस भावाला संशयित आरोपी हा भावेश मधुकर पाटील हा मारहाण करत होता. आपल्या भावाला मारहाण होत असल्याचे पाहून पिडीत महिला ही भांडण सोडविण्यासाठी गेली असता संशयित आरोपी भावेश पाटील याने महिलेसोबत अश्लिल वर्तन केले. त्यानंतर अश्लिल शिवीगाळ करत त्यांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांचा विनयभंग केला. यावेळी महिलेची मावशी आणि भाऊ यांनी पुन्हा मध्यस्थी करून तिला सोडवले. याचा राग आल्याने संशयित आरोपी भावेश पाटील याने सर्वांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना घडल्यानंतर पिडीत महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात संशयित अरोपी भावेश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे करीत आहे.




