जळगाव प्रतिनिधी । लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ व मारहाण केलयाप्रकरणी तीन जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मनिषा भिकन खैरनार (वय-३०) रा. इच्छादेवी मंदीराजवळ तांबापूरा जळगाव ह्या महिला आपल्या मुल व कुटुंबियांसह राहतात. सोमवारी ३१ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून मनिषा खैरनार यांनी जाब विचारला असता त्यांनी गल्लीत राहणारे जुनेद, जुबेर, रईसा (पुर्ण नाव माहित नाही) रा. इच्छादेवी मंदीराजवळ, तांबापूरा जळगाव यांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. मनिषा खैरनार यांच्या फिर्यादीवरून तीन जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.