जळगाव प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीचे लग्न बळजबरीने लाऊन दिल्या प्रकरणी दाखल केलेली फिर्याद मागे घेण्यासाठी जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्याकडून तब्बल २५ लाखांची खंडणी मागणार्या महिलेस रंगेहात अटक करण्यात आली असल्याने या प्रकरणाला आता कलाटणी मिळाली आहे.
मूळच्या श्रीरामपुर येथील महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न बळजबरीने लाऊन दिले म्हणून जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी आणि इतरांविरूध्द गुन्हा दाखल केला होता. यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. यानंतर त्या महिलेने गुन्हा मागे घेण्यासाठी आपल्याला धमकावले जात असल्याचा आरोप करत पुन्हा अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. मात्र दिनांक २८ रोजी या प्रकरणाला पुर्णपणे वेगळे वळण लागले आहे.
या महिलेने पारस ललवाणी यांच्याशी संपर्क साधून २५ लाख रूपयांची मागणी केली होती. ही रक्कम न दिल्यास अजून नवीन गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देखील तिने दिली होती. या अनुषंगाने पारस ललवाणी यांचे बंधू अल्केश ललवाणी यांनी लासलगावच्या जवळग असलेल्या टाकळी विंचूर येथे पोहचले. या महिलेने तेथील ऐश्वर्या लॉजवर पैसे घेऊन बोलावले. दरम्यान, ललवाणी यांनी आधीच पोलीसांना याबाबत माहिती दिली होती. यामुळे संबंधीत महिलेले २५ लाख रूपये घेतांना रंगेहात अटक करण्यात आली.
या प्रकरणात या महिलेसह तिला मदत करणारे जामनेर येथील राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल लोढा आणि सिल्लोड येथील सुनील कोचर यांना देखील आरोपी करण्यात आले आहे.