जळगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदार संघ शिवसेनेला मिळावा, अशी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे, तसेच भाजपशी युती करू नये, अशीही त्यांची इच्छा आहे. अशी माहिती सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज सायंकाळी येथे दिली. आज येथे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यात युतीसंदर्भात कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, तरीही पक्षप्रमुख जी भूमिका घेतील ती त्यांना मान्य असेल असेही ते यावेळी म्हणाले. रावेर मतदार संघात काही कार्यकर्ते भाजपला मदत करण्यास नकार देत आहेत, याबद्दल विचारले असता ना. पाटील म्हणाले की, आमचा कार्यकर्ता आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत असला तरीही तो केवळ आदेशाचा भुकेला आहे. पक्ष प्रमुखांचा आदेश झाल्यानुसार तो कामाला लागेल. आमच्या भावना संपर्कप्रमुख त्यांच्यापर्यंत पोहोचवतील, अंतिम निर्णय मात्र त्यांचाच असून तो सगळ्यांना मान्य असेल, असेही ते यावेळी म्हणाले.
पहा– ना. गुलाबराव पाटील नेमके काय म्हणाले ते !