नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ असलेल्या बुलेट ट्रेनबाबत मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरआढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या प्रगतीपथावर असलेले प्रकल्प, त्यांची सध्या असलेली आवश्यकता, त्यासाठी लागणारा खर्च व निधीची उपलब्धता याचा विचार करून कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्पष्ट केले आहे. बुलेट ट्रेनला महाराष्ट्रातील डहाणू आणि पालघरमधील लोकांचा विरोध आहे. शिवसेनेने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केल्यानुसार, शिवसेना कोणत्याच विकास कामांमध्ये अडथळा बनणार नाही. परंतु, जर एखाद्या प्रकल्पासाठी जनतेचा विरोध असेल, तसेच एखादं विकास काम जनहिताच्या विरोधात असेल तर मात्र शिवसेना त्यावर पुर्नविचार करुन आपला निर्णय घेणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले होते.