यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील फळपीक उत्पादकांना हवामान वर आधारित तापमानाच्या निकषाच्या गोंधळात यावल तालुक्यातील वगळण्यात आल्याने, फळपिक विम्याच्या निकषात तालुक्याचा समावेश करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन शिवसेना (शिंदे) गटाच्या पदधिकाऱ्यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना दिले आहे.
याबाबत आपण तात्काळ संबधित विभागास आदेश देवुन योग्य प्रकारे कारवाई करीत शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देवु असे त्यांनी म्हटले आहे. या प्रसंगी यावल तालुक्यातील शेतकरी हे पिक विम्याच्या निकषात पात्र असतांना ही पिक विमा कंपनीच्या गोंधळलेल्या निकषामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याच्या लाभापासून वंचित व्हावे लागत असल्याने हा शेतकऱ्यांवर अन्याय असून तरी शासनाच्या वतीने या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा, या मागणीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना नुकतेच निवेदन देऊन विनंती करण्यात आली,
यावेळी शिवसेना (शिंदे) गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार, यावल तालुकाप्रमुख राजाभाऊ काटोके, उपप्रमुख रामभाऊ सोनवणे, यावल शहराध्यक्ष पंकज बारी यांच्यासह अन्य शिवसेना ( शिंदे ) गटाचे पदधिकारी उपस्थित होते .