ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश काढल्याने ओबीसी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. या निर्णयाविरोधात ओबीसी संघटना आणि नेते आक्रमक भूमिका घेत आहेत. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. जोपर्यंत भाजप सत्तेत आहे, तोपर्यंत आम्ही ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. असं काही झालं तर मी स्वतः वरिष्ठांशी बोलणार असल्याचे फडवणीसांनी सांगितलं.

मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात घेतलेला निर्णय हा केवळ नोंदी असलेल्यांसाठीच आहे. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत. त्याच व्यक्तींना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यासोबत त्यांच्या रक्तातील नातेवाईकांना याचा फायदा घेता येणार आहे. मात्र, हे आरक्षण सरसकट घेतलेला निर्णय नाही.

मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजातील लोकांनी माध्यमांवर दाखवल्या जात असलेल्या आकडेवारी विश्वास ठेवू नये. या आकडेवारीवर बोलणं चुकीचं आहे. मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर कामकाज सुरू आहे. राज्य मागास आयोग त्यासाठी काम करत असल्याचेही फडणवीस म्हणालेत.

भुजबळांनी ओबीसीवर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे, यासंदर्भात त्यांच्याशी स्वतः चर्चा करणार असल्याचेही फडणवीसांनी सांगितलं. भुजबळांनी त्यांचे आक्षेप मांडावे, त्यावर योग्य ती चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन फडणवीसांनी केले.

Protected Content